दैनिक भ्रमर : शनिवारी कर्नाटकातील काँग्रेस आमदाराला बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणात अटक करण्यात आली. या आमदाराकडून ईडीने तब्ब्ल १२ कोटींची रोकड आणि ६ कोटींचे सोने जप्त केले होते. आता आज पुन्हा एका आमदाराला ईडीने ताब्यात घेतले आहे.
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्ण साहा यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी छापे टाकले होते. त्यानंतर आज जीनव साहा यांना अटक करण्यात आली आहे. शालेय शिक्षक भरतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा
ईडीने तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्णा साहा यांना शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीसंदर्भा अटक केले आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निवासस्थानाची झडती घेतल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने साहा यांना ताब्यात घेतले.
हे ही वाचा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी सुरु असताना आमदार जीवन कृष्णा साहा यांनी भिंतीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. साहा यांनी त्यांचे फोन घरामागील नाल्यात फेकून दिले. उरलेले फोन अधिकाऱ्यांनी जप्त केले. छाप्याच्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये आमदार भिजलेल्या अवस्थेत असल्याचे पाहायला मिळाले.