१६ तासांच्या चौकशीनंतर , मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक
१६ तासांच्या चौकशीनंतर , मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक
img
Dipali Ghadwaje
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली आहे. सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने मंगळवारी मंगलदास बांदल यांच्या शिरूर आणि पुण्यातील निवासस्थानांवर छापेमारी केली होती. यात मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी कोट्यावधी रुपयांचे घबाड सापडले होते. याप्रकरणी ईडीने बांदल यांची चौकशी केली. या चौकशीनंतर ईडीने बांदल यांना अटक केली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी मंगळवारी (20 ऑगस्ट) ईडीने अचानक धाड टाकली. मंगलदास बांगल यांच्या शिक्रापूर आणि पुण्यातील हडपसर भागातील महंमदवाडी परिसरात असलेल्या निवासस्थानी ईडीने सकाळी 7 वाजताच कारवाईला सुरुवात केली.

या कारवाईत त्यांच्या घरात 5 कोटी 60 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे पाच अलिशान कार, एक कोटींची चार घड्याळेही जप्त करण्यात आली आहेत.

ईडीने तब्बल 16 तास कारवाई केली होती. यावेळी मंगलदास बांदल यांची कसून चौकशीही करण्यात आली. तसेच शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल, दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. तर, महंमदवाडी येथील बंगल्यात राहत असलेल्या मंगलदास बांदल यांचीदेखील ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ईडीच्या या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना मुंबईच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group