माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा भीषण अपघात
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा भीषण अपघात
img
Dipali Ghadwaje
राज्यात अपघाताच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत.  अशातच  चाळीसगावात येथून अपघाताची बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित अपघाताची घटना ही धुळे-सोलापूर महामार्गावर चाळीसगावमध्ये घडली. या अपघातात संजना जाधव आणि गाडीचा चालक हा थोडक्यात बचावला आहे. एका पिकअप गाडीने समोरुन संजना जाधव यांच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे ही अपघाताची घटना घडली.  

अपघात घडल्यानंतर लगेच स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली. तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनीदेखील बचावासाठी धाव घेतली. यावेळी गाडीतील संजना जाधव आणि त्यांच्या गाडीचा चालक सुखरुप असल्याची माहिती समोर आली. तसेच संजना जाधव यांच्या गाडीला धडक देणारा पिकअप ड्रायव्हर सुद्धा सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात सध्या प्रत्येक पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्यामुळे नेतेमंडळी वेगवेगळ्या भागातील दौरे करत आहेत. यासाठी अनेक जण रस्तेमार्गाने प्रवास करतात. संजना जाधव या देखील राजकारणात सक्रीय आहेत. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे संजना जाधव यांचे पती होते. पण कौटुंबिक कलहानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव याचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर कन्नड विधानसभा निवडणुकीत दोन्ही पती-पत्नी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा वारंवार होत असते. अर्थात याबाबत काय-काय घडामोडी घडतात? ते आगामी काळात स्पष्ट होईल.



 
इतर बातम्या
Join Whatsapp Group