अंबानींच्या अडचणीत वाढ; १७ हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळ्याचा आरोप,  ईडीनंतर सीबीआयची छापेमारी
अंबानींच्या अडचणीत वाढ; १७ हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळ्याचा आरोप, ईडीनंतर सीबीआयची छापेमारी
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : कर्ज घोटाळाप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते. त्यानंतर आज सीबीआयने अनिल अंबानी यांच्या जवळपास सहा ठिकाणी छापे टाकले आहेत.  उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तब्बल १७ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने शनिवारी सकाळी मुंबईतील कफ परेड येथील सीविंड या निवासस्थानी छापा टाकला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. ईडीनंतर सीबीआयनं छापा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कर्जाची रक्कम कथितपणे इतर कंपन्यांकडे वळवण्यात आली आणि मनी लाँड्रिंगच्या कक्षेत येणाऱ्या विहित उद्देशाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरली गेली, असा आरोप आहे. या छाप्यांमध्ये अनेक कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर पुरावे ताब्यात घेण्यात आले. सीबीआयनं रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अंबानी यांच्या प्रोजेक्ट्सशी संबंधित काही ठिकाणी छापे घालत एफआयआर दाखल केला आहे. 

हे ही वाचा 
मनोज बाजपेयींच्या नव्या वेब सीरिजमध्ये झळकणार ‘हा’ मराठी कलाकार; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये कमावलंय मोठं नाव

 सीबीआयचे छापे का ? 

१. येस बँकेनं दिलेल्या १७ हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा अंबानींवर आरोप.

२. अनिल अंबानींनी मंजूर कर्ज अन्य कंपन्यांत वळवल्याचा आरोप आहे.

३. अनिल अंबानींनी कागदपत्रे सादर करण्यास १० दिवसांचा मागितला कालावधी.

४. दहा दिवसांचा वेळ न देता सीबीआयची ६ ठिकाणांवर छापेमारी.

५. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि इतर ठिकाणी छापेमारी.

काही दिवसांपूर्वीच ईडीनं १७ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी यांची चौकशी केली होती. घोटाळ्यातील कथित गैरव्यवहारामुळे स्टेट बँकेला तब्बल २ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group