जामनगर : रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट यांच्या शुभविवाहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘प्री वेडिंग’ सोहळ्याचे वेध सध्या अंबानी कुटुंबीयांना लागले आहेत
देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंगचा मेन्यू खूपच खास असणार आहे. यात 2,500 पदार्थांचा समावेश असेल.
अनंत आणि राधिकाचं लग्न यावर्षाच्या शेवटी पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये तीन दिवस त्यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम पार पडणार आहे. जगभरातील अनेक दिग्गज मंडळी या प्री-वेडिंगला हजेरी लावणार आहेत.
2,500 पदार्थांची मेजवानी
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, द जार्डिन हॉटेलच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानींच्या मुलाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात दिवसातून चार वेळा जेवण वाढलं जाणार आहे. यात थाई, जपानी, मेक्सिकन, पारसी आशियाईसह जवळपास 2,500 पदार्थांचा समावेश असणार आहे. दिवसाला नाश्त्याला 75 पदार्थ, दुपारच्या जेवणाला 225 पदार्थ आणि रात्रीच्या जेवणाला 275 पदार्थांचा समावेश असेल. तसेच मध्यरात्रीदेखील पाहुण्यांना जेवण मिळणार आहे. मध्यरात्रीदेखील 85 पेक्षा अधिक पदार्थ असतील. मिड नाईट मील खास परदेशी पाहुण्यांसाठी ठेवण्यात आलं आहे.
100 पेक्षा अधिक शेफ बनवणार जेवण
मीडिया रिपोर्टनुसार, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात 20 महिला शेफसह 65 शेफ असणारा एक ग्रूपचा समावेश आहे. तसेच इंदौर सराफा फूड काउंटरदेखील तिथे लावलं जाणार आहे. यात इंदौर कचौरी, पोहे जिलेबी, पॅटीज, उपमा अशा पदार्थांचाही समावेश असणार आहे.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला दिग्गजांची मांदियाळी
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला देशासह परदेशातील मंडळीदेखील उपस्थित असणार आहेत. यात अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जौहर, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर या सेलिब्रिटींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील पॉप सिंगर रिहानाचा या प्री-वेडिंगला खास परफॉर्मेंस असणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग, मॉर्गल स्टेनलीचे सीईओ टेड पिक, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, डिज्नीचे संस्थापक बॉब इगरसह अनेक मंडळी हजेरी लावणार आहेत.