बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सीनं अचानक दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेल्या विक्रांत मेस्सीनं इंडस्ट्री सोडण्याची घोषणा केली. यासंदर्भात त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या भूमिकांनी सर्वांना खिळवून ठेवणाऱ्या दिग्गज अभिनेत्यानं अचानक इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते भांबावून गेले आहेत. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना विक्रांत मेस्सीनं सर्वांना हादरवणारा धक्कादायक निर्णय घेतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
12th Fail सिनेमातून लोकप्रिय झालेला अभिनेता विक्रांत मेस्सीने बॉलिवूडमधून निवृत्तीची घोषणा केलीय. वयाच्या ३७ व्या वर्षी विक्रांत बॉलिवूडमधून संन्यास घेणार असल्याने त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.
विक्रांतने अचानक हा निर्णय का घेतला त्याचं कारणही त्याने सांगितलं आहे. विक्रांतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याने अचानक बॉलिवूडमधून रिटायरमेंटचा निर्णय का घेतला, याविषयी माहिती दिलीय.
विक्रांतने घेतला बॉलिवूडमधून संन्यास विक्रांतने सोमवारी (२ डिसेंबर) पहाटे सोशल मीडियावर पोस्ट करुन आपला हा निर्णय सर्वांना सांगितला. विक्रांत म्हणाला की, "गेले काही वर्ष माझ्यासाठी फार वेगळी आणि विलक्षण आहेत. ज्यांनी मला कायम सपोर्ट केला त्या सर्वांचे मी आभार मानतो. परंतु मी आयुष्यात जसं पुढे जातोय तसं मला कळालं की एक पती, बाप, मुलगा आणि अभिनेता म्हणून आत्मपरिक्षण करायची गरज आहे.
त्यामुळे पुन्हा घरी परतायची वेळ झाली आहे." विक्रांतने निवृत्तीचा निर्णय का घेतला? विक्रांतने शेवटी सांगितलं की, "२०२५ मध्ये आपण शेवटचे एकदा भेटू. जोवर योग्य वेळ येत नाही. माझे २ सिनेमे आणि असंख्य आठवणी आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे खूप आभार. कायम मी तुमचा ऋणी असेन." अशी पोस्ट करुन विक्रांतने ही घोषणा केलीय.
२०२५ मध्ये विक्रांतचे 'यार जिगरी' आणि 'आँखो की गुस्ताखियाँ' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यानंतर विक्रांत बॉलिवूडमधून संन्यास घेईल. सध्या विक्रांतचा 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमा चांगलाच गाजतोय. परंतु या सिनेमाच्या दरम्यान विक्रांत आणि त्याच्या कुटुंबियांना धमक्यांचे फोन आले. त्यामुळे विक्रांतने हा निर्णय घेतला का? अश्या चर्चा सुरु आहे.