बॉलिवूडमध्ये गेल्या काहीदिवसांपासून अनेक स्टार किड एन्ट्री करताना दिसत आहे. मात्र काही चाहत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे तर काही चाहते त्यांच समर्थन करताना दिसत आहे. यातच आता कपूर कुटुंबातून आणखी एक व्यक्ती बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
करिश्मा आणि करीना कपूरनंतर पहिल्यांदाच कपूर कुटुंबातील कोणीतरी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा साहनी लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. रिद्धिमा साहनीने स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
एका मुलाखतीमध्ये रिद्धिमा म्हणाली की, चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले असून आम्ही जून 2025 पर्यत डोंगरात चित्रीकरण करणार आहे. मी आणि संपूर्ण कुटुंब खूप उत्सुक आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मी माझ्या आईसोबत राहिलो आणि आम्ही यादरम्यान खूप रिहर्सलही केली. तर दुसरीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी मुलगी समायरा देखील मला भेटायला येणार आहे. अशी माहिती रिद्धिमाने या मुलाखतीमध्ये दिली.
पुढे या मुलाखतीमध्ये बोलताना रिद्धिमा म्हणाली की, बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा काहीच प्लॅन नव्हता. मात्र जेव्हा मला या चित्रपटासाठी विचारण्यात आले तेव्हा मी फक्त हो असं उत्तर दिले. मी या चित्रपटाची स्टोरी ऐकली आणि मला स्टोरी खूप आवडली. असं देखील ती या मुलाखतीमध्ये म्हणाली.
तर दुसरीकडे रिद्धिमाने 2024 मध्ये ओटीटीवर एन्ट्री केली आहे. ती फॅब्युलस लाईव्हज विरुद्ध बॉलीवूड वाइव्हज सीझन 3′ मध्ये दिसली होती. हा एक रिॲलिटी शो होता ज्यामध्ये रिद्धिमाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.