संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या संपत्तीचा वाद; करिश्मा आणि मुलांना काय मिळणार?
संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या संपत्तीचा वाद; करिश्मा आणि मुलांना काय मिळणार?
img
वैष्णवी सांगळे
बॉलिवूड अभिनेत्री  करिश्मा कपूरचा EX पती आणि अब्जाधीश व्यावसायिक संजय कपूर यांचा 12 जून रोजी लंडनमध्ये मृत्यू झाला. गॉर्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळताना एक मधमाशी त्यांच्या गळ्यामध्ये गेली आणि तिच्या दंशामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यातच त्यांचे निधन झाले. संजय कपूर सोना कॉमस्टार या जगातील प्रमुख ऑटो कंपोनेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीचे चेअरमन होते. 

कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 31,000 कोटी रुपये आहे. संजयच्या निधनानंतर उत्तराधिकारी कोण असेल याबद्दल चर्चा सुरू झाली आहे . फोर्ब्सच्या मते, संजय कपूर यांची एकूण संपत्ती सुमारे 1.2 बिलियन डॉलर (10,300 कोटी रुपये) होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्युपत्र आणि ट्रस्टनुसार, संपत्तीची जबाबदारी आता त्यांची पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्याकडे जाईल. याचा अर्थ, त्यांचा मुलगा अजेरियसचा हिस्सा अप्रत्यक्षपणे त्याच्या आईद्वारे व्यवस्थापित केला जाईल.

हे ही वाचा... 
सावध व्हा !नोटा अगदी हुबेहूब; बनावट 500 रूपयांच्या नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस

संजयचे दुसरे लग्न अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत झाले होते. 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. या लग्नापासून झालेली त्यांची मुले समायरा आणि कियान यांच्यासाठी आधीच आर्थिक व्यवस्था करण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, दोन्ही मुलांना 14 कोटी रुपयांचे बॉंड्स भेट म्हणून दिले होते. तसेच, त्यांना दरमहा 10-10 लाख रुपयांचे नियमित उत्पन्न सुनिश्चित केले आहे. याव्यतिरिक्त, संजय कपूर यांच्या वडिलांच्या नावावर असलेली एक प्रॉपर्टी (घर) करिश्मा कपूरला कस्टडी अलॉटमेंटच्या वेळी देण्यात आली होती. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group