सावध व्हा !नोटा अगदी हुबेहूब; बनावट 500 रूपयांच्या नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस
सावध व्हा !नोटा अगदी हुबेहूब; बनावट 500 रूपयांच्या नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस
img
वैष्णवी सांगळे
अहिल्यानगर तालुका पोलिसांनी हुबेहूब 500 रूपयांच्या भारतीय चलनी नोटांसारख्या बनावट नोटा छापणार्‍या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.  पोलिसांनी सापळा रचून निखील शिवाजी गांगुर्डे आणि सोमनाथ माणिक शिंदे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या वाहनातून 80 हजार रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. 

पुढील तपासात बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथून आणखी संशयित आरोपींचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी प्रदीप संजय कापरे, मंगेश पंढरी शिरसाठ, विनोद दामोधर अरबट, आकाश प्रकाश बनसोडे आणि अनिल सुधाकर पवार यांना अटक केली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अंबादास रामभाऊ ससाणे अद्याप पसार असून त्याचा शोध सुरू आहे.या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे. 

हे ही वाचा... 

चौकशीदरम्यान संशयित आरोपींनी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळुंज एमआयडीसी परिसरात एक घर भाड्याने घेतल्याची कबुली दिली. त्या ठिकाणी बनावट नोटा छापण्याचा संपूर्ण सेटअप उभारण्यात आला होता. पोलिसांनी तेथे छापा टाकून 59 लाख 50 हजार रूपयांच्या बनावट नोटा, तसेच 2 कोटी 16 लाख रूपयांच्या बनावट नोटा छापण्यासाठी आवश्यक कागद, शाई, अत्याधुनिक छपाई मशिन असा एकूण 88 लाख 20 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group