खळबळजनक ! महिन्याचा पगार 15 हजार अन लिपिकाकडे सापडली 30 कोटींची मालमत्ता
खळबळजनक ! महिन्याचा पगार 15 हजार अन लिपिकाकडे सापडली 30 कोटींची मालमत्ता
img
वैष्णवी सांगळे
बेंगळुरू (भ्रमर वृत्तसेवा) : कर्नाटक मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कर्नाटकातील कोप्पल शहरात एका माजी लिपिकाकडे 30 कोटींची मालमत्ता सापडली आहे. त्याच्या घरावर अधिकार्‍यांनी छापा टाकला असता ही बाब उघडकीस आली.

कलप्पा निदगुंडी हा कर्नाटक रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेडमध्ये लिपिक म्हणून 15 हजार रुपये पगारावर कामाला होता. त्याच्या घरी लोकायुक्तांच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला असता त्याच्याकडे 24 रहिवाशी निवासस्थाने, चार प्लॉट आणि 40 एकर शेतजमिनीची कागदपत्रे आढळून आली. छापा टाकणार्‍या अधिकार्‍यांनी सांगितले की, छाप्यावेळी त्याच्या घरी 350 ग्रॅम सोने, दीड किलो चांदी आणि दोन कार व दोन दुचाकी आढळून आल्या.

हे ही वाचा... 
कबुतरांना खायला घातलं तर खबरदार ! पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल

कलकप्पा निदागुंडी आणि केआरआयडीएलचे माजी इंजिनिअर झेडएम चिंचोलकर यांनी 96 अपूर्ण प्रोजेक्टसाठी बनावट कागदपत्रे तयार केली. त्याच्या माध्यमातून 72 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गैरव्यवहार केला गेला. या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. 

हे ही वाचा... 
रोहिणी खडसेंची पतीला वाचवण्यासाठी धडपड, 'या' मोठ्या नेत्याच्या भेटीला

त्यानंतर लोकायुक्तांचे अधिकारी सरकारी अधिकार्‍यांच्या घरी छापे टाकत होते. त्यात आयएएस अधिकार्‍यासह 8 जणांवर छापे टाकण्यात आले. यात 37.42 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. हे छापे बंगळुरू, म्हैसूर, तुमकुरु, कलबुर्गी, कोप्पल, कोडागु जिल्ह्यात 41 ठिकाणी टाकले. कोप्पलचे आमदार राघवेंद्र हितनाळ यांनी म्हटले की, सरकार हा मुद्दा गांभीर्याने घेत आहे. सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करेल. यातील दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group