सिनेसृष्टीवर शोककळा! सुप्रसिद्ध निर्मात्याने संपवले जीवन, पोलिसांकडून तपास सुरु
सिनेसृष्टीवर शोककळा! सुप्रसिद्ध निर्मात्याने संपवले जीवन, पोलिसांकडून तपास सुरु
img
Dipali Ghadwaje
 कन्नड चित्रपट निर्माते आणि उद्योजक सौंदर्या जगदीश यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांचं निधन झालं. रविवारी १४ एप्रिलला ते त्यांच्या बंगळुरूमधील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले. त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मृत्यूसमयी त्यांचं वय ५५ वर्षे होतं. 

मिळालेल्या  माहितीनुसार, रविवारी 14 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास बेंगळुरू येथील महालक्ष्मी लेआउट येथील निवासस्थानी सौंदर्या जगदीश यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही आत्महत्या आहे की घातपात आहे? त्यामागील नेमकं कारण काय? अशा वेगवेगळ्या अँगलने पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. 

जगदीश यांचा जवळचा मित्र श्रेयस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर जगदीशचा मृत्यू झाला आहे. आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात दाखले केले. मात्र, त्याला त्या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले. जगदीश याला  आरोग्यविषयक कोणत्याही समस्या नव्हत्या. या क्षणी तरी आम्ही नेमंक कारण सांगू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , नुकतेच काही दिवसांपूर्वी जगदीश यांच्या सासूचे निधन झाले होते.  जगदीश आणि त्यांच्या सासूमध्ये चांगले भावनिक बंध जुळले होते. मात्र, त्यांच्या निधनाने जगदीश खचले आणि मानसिक तणावात गेले. काही दिवसांपासून जगदीश हे ताण-तणावावर औषधेदेखील घेत होते. 

वादात अडकला होता पब
सौंदर्या जगदीश हे एका पबचे मालक होते. ते चित्रपट निर्माता आणि बांधकाम व्यावसायिक होते. त्याशिवाय त्यांचे इतरही व्यवसाय होते. वृत्तानुसार, काही चित्रपट कलाकार आणि क्रू हे पबमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचा पब अलीकडेच वादात सापडला होता. त्यामुळे त्यांच्या पबचा परवाना तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आला होता. याची चिंताही त्यांना सतावत होती. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group