बंगळुरूमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. बायोलॉजी आणि फिजिक्स शिकवणार्या प्रोफेसरने विद्यार्थीनीच्या अब्रूचे लचके तोडल्याची संतापजनक घडना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , कर्नाटकमधील बेंगळुरू येथे दोन प्रोफेसरच्या लज्जास्पद कृत्याने संतापाची लाट उसळली आहे. बायोलॉजी आणि फिजिक्स विषयांच्या शिक्षकांनी ब्लॅकमेल करत एका विद्यार्थिनीवर बलात्कार केला.
नराधमांनी मुलीला ब्लॅकमेल करून अनेक वेळा आपल्या वासनेचे बळी बनवले. कॉलेजमधील विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग केल्याच्या आरोपाखाली या दोन शिक्षकांसह त्यांच्या एका मित्राला अटक करण्यात आली आहे. नरेंद्र आणि संदीप अशी दोन्ही शिक्षकांची नावे आहेत. त्यांचा मित्र अनूप यालाही बेड्या ठोकल्यात आल्या आहेत.
हे तिघे एका खासगी कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. पीडित मुलगी देखील याच कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला ब्लॅकमेल करत दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केला. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले की, सुरुवातीला नरेंद्रने नोट्स देण्याच्या बहाण्याने संपर्क साधला. त्यानंतर मैत्री झाली. नरेंद्रने एका दिवशी अनूपच्या खोलीवर बोलावले, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. आणि धमकी दिली.
काही दिवसांनंतर संदीपनेही तिला त्रास देण्यास सुरुवात केली. जेव्हा तिने याला विरोध केला, तेव्हा त्याने तिला कथितपणे ब्लॅकमेल केले. नरेंद्रसोबतच्या प्रसंगाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संदीपनेही तिच्यावर बलात्कार केला. माहितीनुसार, अनूपने तिला त्याच्या खोलीत येतानाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून धमकावले आणि तिचा लैंगिक छळ केला.
पीडितेने यानंतर आपल्या आई-वडिलांना याबाबत सांगितले. कुटुंबाने पोलिसांत याबाबतची तक्रार दिली असून तिघांना बेड्या ठोकल्यात आल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.