लासलगाव (भ्रमर वार्ताहर) : लासलगाव येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेस्थानकाशेजारी असलेल्या वस्तीवर प्रेमप्रकरणातून अल्पवयीन युवतीच्या भावाने अल्पवयीन युवकावर मित्रांच्या साथीने तलवारीने हल्ला केला. या युवकाचे उपचार सुरु असताना निधन झाले.
मनमाड लोहमार्ग पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून, त्याच्या घरातील काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान ही घटना खरोखर प्रेमप्रकरणातून झाली की यामागे वेगळी कारणे आहेत याबाबत तर्कविर्तक व्यक्त केले जात आहेत. अल्पवयीन युवती ही रेल्वेस्थानकालगत राहते.
प्रेमप्रकरणाच्या वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा परिसरात असून काल दुपारी या युवतीच्या भावाने तसेच मित्रांनी लासलगाव येथील संजयनगरमध्ये राहणार्या युवकाला बेदम मारहाण करत घराच्या गच्चीवर नेत तलवारीने हल्ला केला. पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी या ठिकाणी तातडीने दाखल झाले होते. घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.