जन्म-मृत्यू प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय ; आता 'या' लोकांचं प्रमाणपत्र होणार रद्द
जन्म-मृत्यू प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय ; आता 'या' लोकांचं प्रमाणपत्र होणार रद्द
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अधिकार कक्षेबाहेर जाऊन जन्म- मृत्यू नोंदी घेण्याचे आदेश दिले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अनेक जन्म-मृत्यूचे अनेक बनावट दाखले दिल्याचा संशय आहे. त्यामुळे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशयाच्या भोवऱ्यात

जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी २१ दिवसात अर्ज करणे गरजेचे आहे. जर तुम्ही एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर अर्ज केले आणि हे प्रमाणपत्र तहसीलदरांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत असेल तर ते रद्द होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला शासन निर्णयानुसार, फक्त जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदाराकडूनच जन्म-मृत्यूचा दाखला मिळवावा लागेल. याचसोबत त्यासाठी ठरावीक वेळेत अर्ज करावा लागेल.

भीषण अपघात ! कारचा चक्काचूर, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

शासनाने १२ मार्च २०२५ रोजीच्या निर्णयानुसार विलंबित जन्म मृत्यू नोंदी घेण्याची कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे. आता १ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीनंतर जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी नोंद केलेली ग्राह्य धरली जाणार नाहीत. अशी प्रमाणपत्र रद्द केली जाणार आहे. याबाबत सर्व माहिती निबंधकांनी तहसीलदारांना द्यायची आहे.





इतर बातम्या
Join Whatsapp Group