मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता या आठवड्यात येऊ शकतो, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, आता अजित पवारांनी स्वतः मे महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

अजित पवार यांनी मध्यंतरी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. त्यांनी स्वतः पावणे चार कोटी रुपयांच्या फाइलवर सही केली, जेणेकरुन या योजनेअंतर्गत लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. आता अजित पवारांनी स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर लवकरच पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील.
मे महिना संपायला अवघे ४-५ दिवस उरले आहेत. त्यामुळे महिनाअखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून दिली जाईल.
या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. अनेकांनी बोगस कागदपत्रे दाखवून लाभ घेतल्याचे समोर आले आहे. याचसोबत अनेक पुरुषांच्या नावाने अकाउंट उघडून फसवणूक झाली आहे. त्यामुळे पडताळणी पुन्हा करण्यात आली आहे. यामध्ये ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहे. याचसोबत फ्रॉड करणाऱ्यांचेही अर्ज बाद केले जाणार आहेत. या महिलांना या योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही.