राज्य सरकारची लाडकी बहीण योजना आणि योजनेतून दर महिन्याला मिळणारे १५०० रुपये. ज्याची वाट पात्र महिला दर महिन्याला पाहत असतात. कधी थोडा वेळ लागतो . मात्र या योजनेत १५०० ऐवजी २१०० देणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र ते अद्यापही महिलांना मिळत ज्यामुळे अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात मोठी माहिती दिली आहे.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले. लाडक्या बहिणींना नावनोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नावनोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे कोणताही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना लक्ष्य करून तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलू नये. या योजनेला तुम्ही विरोध केला होता. तुम्ही योजनेला विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील, असा हल्लाबोल केला. यासह लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार? असे विचारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभही देऊ, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली.