राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांनी भरभरून काम केलं. आता सरकारचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्याचा मानस आहे.
याचदरम्यान अंगणवाडी सेविकांनी सरकारकडे ४ मागण्या केल्या आहेत. सरकारने ४ मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर योजनेचं सर्वेक्षणाचं काम करणार नाही, असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. तसेच ३ मार्च रोजी मुंबईत सभा घेरणाअसल्याचाही इशारा संघटनेने दिला आहे.
अमरावती अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला.
यावेळी महिला बालकल्याण कार्यालयासमोरील रस्ता महिलांनी अडवला. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करणार नाही. लाडकी बहीण योजनेवर अंगणवाडी सेविका बहिष्कार घातलील, असा इशारा सेविकांनी दिला.
काय आहे "त्या" चार मागण्या :
अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेच्या सर्व्हेचे प्रति फ्रॉम 50 रुपये देण्याची मागणी केली आहे. अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचारी दर्जा आणि ग्रॅच्युटी देण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व भत्ते वेळेवर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये केलेल्या कामाचा मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. अंगणवाडी उघडण्याची वेळ जिल्हाभरात सारखीच ठेवावी, अशीही त्यांची मागणी आहे. यावेळी सरकारविरोधात अंगणवाडी सेविकांनी आक्रमक घोषणाबाजी केली.