मोठी अपडेट :
मोठी अपडेट : "या" लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही जानेवारीचा हप्ता
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.

डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पैशांकडे महिलांचे लक्ष आहे. या योजनेत काही महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

त्याचसोबत आता तुम्ही जर इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचे आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे २.५ लाखांपेक्षा कमी असावे.

सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचसोबत पेन्शनधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही . २१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी. जर महिला इतर योजनांचा लाभ घेत असेल तर कोणत्याही एका योजनेचा लाभ तिला घ्यावा लागणार आहे. पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेतल असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group