उत्तराखंडमधील हरिद्वार येथील प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी प्रचंड गर्दी जमल्यामुळे चेंगराचेंगरी झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता पहिल्याचं श्रावणी सोमवारी उत्तर प्रदेशाच्या बाराबंकी शिवमंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. टीनच्या पत्राशेडवर विजेची तार पडल्याने ही दुर्घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , या घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यात जखमी असलेल्या 5 जणांची प्रकृती विजेचा धक्का बसल्याने गंभीर आहे.
या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार ही विजेची तार माकडांनी तोडल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर संवेदना व्यक्त केल्या. अधिकाऱ्यांना तात्काळ या पिडीत कुटुंबांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच योग्य उपचार तात्काळ देण्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.