आधीच वाढणारे कर, बेरोजगारीचा प्रश्न असे अनेक प्रश्न भेडसावत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी धक्कादायक समोर आणली आहे. तुमच्या खिशात असणारी नोट नकली तर नाही ना ? कारण राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलंय. बनावट नोटांचा हॉटस्पॉट कुठे आहे? याची माहिती त्यांनी विधानभवनात दिली.
विधानभवनातही बनावट नोटांचा मुद्दा चर्चेत आलाय. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखी उत्तर देत बनावट नोटांचे हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणांसह कारवाईसंदर्भातील माहिती दिली.
1. आतापर्यंत 1.4 कोटींच्या बनावट नोटा जप्त
2. चलनात 500 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट
3. 566 जणांना पोलिसांकडून अटक
4. 2020 पासून राज्यात 273 गुन्हे दाखल
काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधील ज्वेलर्समधील एक व्यक्ती बँकेत पैसे जमा करायला गेली. त्यावेळी 500 रुपयांच्या सहा बनावट नोटा बंडलमध्ये आढळल्या. ज्यामुळे नोटा जमा करणाऱ्या व्यक्तीला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं. त्यामुळे यापुढे कुणीकडूनही नोटा घेताना ती बनावट नाही ना? याची खात्री करून घ्या...अन्यथा खिशाला कात्री आणि तुरुंगवास दिवसरात्री.. अशीच परिस्थिती होईल.