आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे. अशातच आकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा झाली, मात्र या प्रक्रियेत आपल्याला विश्वासात न घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पाटील यांनी काँग्रेसचा 'हात' सोडण्याचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.