पुढील 24 तास धोक्याचे ! गारपिटीसह जोरदार पावसाला सुरूवात
पुढील 24 तास धोक्याचे ! गारपिटीसह जोरदार पावसाला सुरूवात
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान हवामानात मोठे बदल होताना दिसत असून एकीकडे उष्णेतेचा कडाका वाढला असताना राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. ऐन मार्च महिन्यात राज्यात वादळी पावसासह गारपीट होत आहे. राज्यातील अनेक भागात काल पावसाने हजेरी लावली. दरम्यान आज देखील वादळी वाऱ्यांसह पावसाची आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

गडचिरोलीत विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. हवामानात अचानक बदल झाले असून एकीकडे उष्णतेची लाट सुरू असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने राज्यातील काही भागात 18 ते 20 मार्च असे 4 दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती. गडचिरोली जिल्ह्यात 18 मार्च रोजी पहाटे साडेचार वाजतापासून वादळी पावसाने हजेरी लावली. 

सांगली जिल्ह्यात मिरज पूर्व भागात काल वादळी वाऱ्यासह गारांचा प्रचंड पाऊस पडला. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरज बेडग रोड वरील शाळूचे पीक अक्षरश भुईसपाट झाले आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.

अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला असून या पावसाने आंबा, गहू, ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. लातूर, निलंगा, औसा, चाकुर,रेणापूर, देवणी ,उदगीर ,अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, भागात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला आहे. धाराशिवच्या लोहारात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठा फटका. हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

या जिल्ह्यांना अलर्ट?
आज चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ७ जिल्ह्यांना पुढील ४८ तासांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला.तर नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group