पावसाचा कहर ! होत्याचं नव्हतं झालं , 89 लोकांचा मृत्यू तर 114 जणावर दगावली, कुठे घडली घटना ?
पावसाचा कहर ! होत्याचं नव्हतं झालं , 89 लोकांचा मृत्यू तर 114 जणावर दगावली, कुठे घडली घटना ?
img
Nandini khandare More


सध्या वातावरणात सतत बदल होत आहेत. दरम्यान आता एक अतिशय ह्रदयद्राक अशी घटना समोर आली आहे.  उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाने आणि चक्रीवादळाने कहर केला. या मध्ये  89 लोकांचा मृत्यू तर114 जणावर दगावली असून 53लोक गंभीर जखमी आहेत. ही गंभीर घटना काल  बुधवार 13  मे 2026 रोजी उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. 

या घटनेने एकच खळबळ उडाली. उत्तर प्रदेशातील फतेहपूर, प्रयागराज, प्रतापगढ, भदोही, देहाट, चंदौली, सोनभद्र, बरेली, मिर्झापूर, बदाऊन, उन्नाव, कानपूर या जिल्ह्यात पावसाचा थैमान बघायला मिळाले. मोठं मोठी झाडे पडली. घरे पडली. एक थैमान निसर्गाने घातले. ज्यात अनेक लोकांची जीव गेली. या वादळात एकट्या प्रयागराजमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बचाव कार्यही तातडीने सुरू करण्यात आले. मात्र, वारे आणि पाऊस इतका जास्त भयंकर होता की, बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता. प्रशासनाने तात्काळ अलर्ट जारी केला.

चक्रीवादळात जनावरांचाही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. 114 जनांवरांचा या वादळात जीव गेला. वित्त आणि महसूल विभागाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी विनिता सिंह यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन सर्व तालुक्यांमधून माहिती गोळा करत आहे. महसूल विभाग सध्या माहिती संकलित करत आहे. त्यामुळे तात्काळच मृतांचा आकडा सांगणे कठीण आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान,  मृतांचा आकडा वाढण्याचेही संकेत आहेत. हवामान विभागाने अलर्ट अगोदरच जारी केला होता. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि चक्रीवादळ येईल, याचा अंदाज कोणालाही नव्हता. दरम्यान,  प्रशासनाकडून मदतकार्य राबवले जात आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 




इतर बातम्या
Join Whatsapp Group