भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का ! ''ती'' जागा नवनीत राणांना मिळणार ?
भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का ! ''ती'' जागा नवनीत राणांना मिळणार ?
img
Nandini khandare More
राज्यातील घडामोडींना वेग आला असून सध्या राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्व्भूमीवर सध्या  मोठा धुमाकूळ सुरु असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या अपडेट नुसार भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 

सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाल्याचं पहायला मिळालं. मात्र या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या पराभव केला. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार गटातून राज्यसभेवर वर्णी लागली. परंतु अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला. सुनेत्रा पवार या विधान सभेच्या सदस्य झाल्यामुळे त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची ही जागा रिक्त झाली आहे.

दरम्यान आता भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे.  सुनेत्र पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्याची नाही तर भाजप नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून यासंदर्भात माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या जागेवर आता भाजप नेत्या नवनीत राणा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group