उदय सामंतांचं नाव घेत सदावर्तेंचा मोठा दावा, म्हणाले, मनोज जरांगे तर ...
उदय सामंतांचं नाव घेत सदावर्तेंचा मोठा दावा, म्हणाले, मनोज जरांगे तर ...
img
Nandini khandare More

 मराठा आंदोलनावरून पुन्हा  एकदा महाराष्ट्र तापताना दिसतोय आजच मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणायची घोषणा केली आहे. याचदरम्यान , आता यावरून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. 

ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांचा एकही प्रश्न घेतला नाही. ते राजकीय नखरे ठेऊन आंदोलन करत आहेत. त्यांनी माझ्या मराठी बांधवांचा अपमान केला आहे. जरांगे पाटील हे मराठा बांधवांचे नेते असूच शकत नाहीत, मनोज जरांगे पाटील हे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते असू शकतात.  उदय सामंत हे नेहमी मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटत असतात, असा थेट आरोपच गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.

नेमकं काय म्हणाले सदावर्ते? 

  उदय सामंत हे नेहमी मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटत असतात असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. जरांगे हे कधीच संविधानावर बोलत नाही, मनोज जरांगे पाटील हे फक्त मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू शकतात. मनोज जरांगे पाटील यांनी लोकांना त्रास दिला आहे, हे लोक कायम लक्षात ठेवतील.  मराठा कास्ट व्हॅलेडीटी ही बाकीच्या जाती प्रमाणेच करावी लागते,  माझ्या मराठी बांधवाना फसवण्याचा हा डाव आहे, असा  हल्लाबोल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.




इतर बातम्या
Join Whatsapp Group