नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली CJP (कॉक्रोज जनता पार्टी) ने दिल्लीत जोरदार आंदोलन केले. संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. एकूणच संसदेतील पहिलाच दिवस अत्यंत वादळी ठरला.
लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सर्व घडामोडी पाहात आज दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे, आणि याचे पडसाद अधिवेशनाच्या कामकाजावर उमटल्याचं पहायला मिळालं.
विरोधकांनी सरकारला घेरलं, सुरुवातीला लोकसभेचं कामकाज सहा वेळा तर राज्यसभेच कामकाज 5 वेळा तहकूब करण्यात आलं. त्यानंतर मात्र लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे.
दरम्यान दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट संसदेवर मोर्चा काढला आहे. संसद भवन परिसरात मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यासाठी बॅडीकेड लावण्यात आले होते. परंतु आंदोलकांनी बॅडिकेड पार करून संसद भवन परिसरात प्रवेश केल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा केला. तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला. त्यामुळे आंदोलक आधिकच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.