भाजपचे नेते अनेकदा मोदींचं कौतुक करताना ते सुट्टी न घेता काम करणारे नेते असल्याचा उल्लेख करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रात्रंदिवस काम करणारे नेते आहेत. पण खरंच मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत एकही सुट्टी न घेता काम केलं आहे का? असाच एक प्रश्न माहिती अधिकारातून विचारण्यात आला होता. आरटीआयद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तरही आलं आहे.
दरम्यान यामध्ये पंतप्रधान मोदी पूर्ण वेळ ड्युटीवर असतात का? आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर किती कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते? असे प्रश्न विचारण्यात आले होते. या उत्तराची पीएमओच्या वेबसाईटची लिंक देण्यात आली आहे.
2014 पासून नरेंद्र मोदींनी 3000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून आरटीआयद्वारे ही माहिती मागवली होती.
माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पीएमओचे अवर सचिव प्रवेश कुमार यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून एकही सुट्टी घेतलेली नाही. इतकेच नाही तर गेल्या 9 वर्षात त्यांनी देश-विदेशातील 3000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. पुण्यातील नागरी हक्क कार्यकर्ते प्रफुल्ल शारदा यांना माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत ड्युटीवर असतात.