अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लागून मोठा धक्का दिला. ज्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना एकंदरीतच भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या धोरणामुळे भारतीयांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. शेवटपर्यंत भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत आणि भारतावर शेवटी टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ५० टक्के टॅरिफ लावण्यात आल्याने भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर थेट परिणाम होणार आहे.
हे ही वाचा
२४ टक्क्यांपासून सुरू झालेला कर आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.अमेरिकेत परवडणाऱ्या आरोग्यसेवा पुरवण्यात जेनेरिक औषधांचे महत्त्व लक्षात घेता, ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या तात्काळ शुल्क वाढीतून भारतीय औषध उद्योगाला मात्र सूट देण्यात आली. जेनेरिक औषधे सामान्यतः खूप कमी नफ्यावर चालतात. अमेरिकेत रुग्णांवर उपचार करण्यासाठी जेनेरिक औषधांची सतत उपलब्धता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा
अमेरिकेच्या औषध आयातीत भारताचा वाटा सुमारे ६ टक्के आहे, ५० टक्के शुल्कानंतर, भारतीय औषध निर्यातदारांनी त्यांचे शिपमेंट ऑस्ट्रेलियाला हलवण्यास सुरुवात केली, जे अमेरिकन मेडिकेअर प्रणालीच्या स्थिरतेसाठी धोकादायक मानले जात होते. यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय औषधांना ५०% शुल्कातून सूट दिली.अमेरिका औषध पुरवठ्यासाठी भारतावर अधिक अवलंबून आहे. अमेरिकेतील जवळजवळ अर्धी जेनेरिक औषधे भारतातून येतात.