मोठी बातमी : भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, 'ही' ३ नावं आहेत चर्चेत
मोठी बातमी : भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, 'ही' ३ नावं आहेत चर्चेत
img
Dipali Ghadwaje
 २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदलाची प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार  , भाजप पहिल्यांदाच एका महिलेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकते. अलिकडच्या काळामध्ये भाजपला महिला मतदारांना आकर्षित करण्यात यश आले आहे. हे यश भाजपला विशेषतः उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये मिळाले आहे.

महत्वाचे म्हणजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्ये संपला होता. पण पक्षाकडून त्यांना जून २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता पुढील काही दिवसांत भाजपकडून नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाचे म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपने महिलांना राष्ट्रीय अध्यक्ष असावा या कल्पनेला पाठिंबा दिला आहे. अशामध्ये भाजपकडून एका महिला नेत्याची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. या शर्यतीमध्ये तीन प्रमुख महिला नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. या महिला नेत्या कोण आहेत हे आपण जाणून घेऊया...

निर्मला सीतारमण - भाजपमध्ये सर्वात जास्त अनुभवी असलेल्या अर्थमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी पहिल्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. त्यांचा केंद्र सरकारमधील अनुभव देखील दीर्घ आहे. नुकताच त्यांनी भाजप मुख्यालयात जेपी नड्डा आणि सरचिटणीस बीएल संतोष यांच्यासोबत बैठक झाली. दक्षिण भारतातून त्यांचे येणे भाजपच्या दक्षिण विस्तार रणनीतीसाठी फायदेशीर ठरू शकते.

डी. पुरंदेश्वरी - आंध्र प्रदेशमधील भाजपच्या माजी अध्यक्ष डी. पुरंदेश्वरी या एक अतिशय अनुभवी आणि बहुभाषिक नेत्या आहेत. त्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी दुसऱ्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. त्यांना अनेक राजकीय पक्षांसोबत काम करण्याचा अनुभव आहे आणि पक्षासाठी त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक कारवायांमध्ये देखील त्या सहभागी होत्या.

वनथी श्रीनिवासन - तमिळनाडूतील कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघाच्या आमदार आणि भाजप महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा वनथी श्रीनिवासन या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी तिसऱ्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. १९९३ पासून त्या भाजपमध्ये काम करत आहेत. त्यांनी संघटनेत अनेक पदे भूषवली आहेत. २०२२ मध्ये त्या केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य झाल्या होत्या आणि असे करणाऱ्या पहिल्या तमिळ महिला नेत्या होत्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group