२ बड्या नेत्यांकडून काँग्रेसला रामराम, भाजपचं कमळ हाती घेणार
२ बड्या नेत्यांकडून काँग्रेसला रामराम, भाजपचं कमळ हाती घेणार
img
वैष्णवी सांगळे
ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सोलापुरात मोठी राजकीय घडामोड घडत असून काँग्रेसला या ठिकाणी खिंडार पडणार आहे.  पश्चिम महाराष्ट्रात सध्या भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवण्यात येत आहे. ऑपरेशन लोटसमुळे भाजप पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाली आहे. अशातच काँग्रेसचे आणखी दोन नेते भाजपच्या वाटेवर आहेत.



काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्य श्रीलेखा पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच प्रकाश पाटील आणि श्रीलेखा पाटील भाजप पक्षात प्रवेश करतील. माहितीनुसार, प्रकाश पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते सात नोव्हेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पारंपारिक विरोधक मानले जात होते. पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर माळशिरसमध्ये भाजपची ताकद आणखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group