'अनुपमा' फेम अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, भाजपकडून मोठी जबाबदारी मिळणार?
'अनुपमा' फेम अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, भाजपकडून मोठी जबाबदारी मिळणार?
img
Dipali Ghadwaje
दिल्ली :  सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीचं वार वाहत आहे. अनेक अभिनेते , अभिनेत्री सध्या राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत.  यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रणांगणातही अनेक कलाकार दिसून येत आहेत. आता आणखी एका टीव्ही अभिनेत्रीने भाजपमध्ये प्रवेश केला.

अनुपमा फेम अभिनेत्री रूपाली गांगुलीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. रूपाली गांगुलीने हाती कमळ घेतल्याची माहिती मिळत आहे. तिने आज पक्षनेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये रूपाली गांगुलीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 

साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेतून अभिनेत्री रूपाली गागुंली समोर आली होती. आज रूपाली गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्य कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.

रूपाली गांगुलीसोबत अमेय जोशी यांनीही आज भाजपमध्ये पक्षात प्रवेश केला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रूपाली गांगुली राजकारणात उतरली आहे. रुपाली ही सध्या अनुपमा या मालिकेत काम करत आहे. स्टार प्लसवरील ही मालिका सध्या खूप चर्चेमध्ये आहे. 

पक्षप्रवेश झाल्यानंतर अभिनेत्री रुपाली गांगुलीने माध्यमांशी बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांची मी मोठी चाहती आहे. विकासाचं पर्व पाहिल्यावर मलाही यात सहभागी असलं पाहिजे, असं वाटतं. मोदींनी दिलेल्या मंत्रानुसार मी काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया रूपाली गांगुलीने व्यक्त केली आहे. सध्या रूपालीची अनुपमा भूमिका फार चर्चेत आहे. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद तिला मिळत आहे. 

यावेळी बोलताना विनोद तावडे यांनी रूपाली गांगुली आणि अमेय जोशी या दोघांचंही भाजपमध्ये स्वागत केलं आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group