राज्यातील राजकारणात मोठमोठ्या घडामोडींना वेग आला आहेगेल्या काही दिवसांआधीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 18 वर्षांनी एकाच मंचावर आले. त्यांनतर राजकारणात अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. याचदरम्यान आता शिवसेनेची दोन शक्कलं शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट कधी एकत्र येतो याची पण चर्चा सुरू आहे. दोन्ही गटांनी एकत्र येण्याची चर्चा होत आहे.दरम्यान आता उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या एका वक्तव्याने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे पहायला मिळतेय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना सेनेतील ही फूट जिव्हारी लागलेली आहे. या फुटीवरून ते नाराज आहेत. एका मजबूत पक्षाची अशी शक्कलं होणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे त्यांना वाटते. दोन्ही गटांनी पुन्हा एकदा एकत्र यायला हवे असे त्यांना वाटते.
पीटीआयने म्हटल्यानुसार, दानवे यांनी पक्ष फुटीवर भाष्य केले आहे. आम्ही काही सत्तेसाठी पैदा झालेलो नाही. सत्ता तर येते आणि जाते. पण संघटनेची एकजुटता हीच सर्वात मोठी ताकद आहे. कोणाची तरी शिवसेनाला नजर लागली आणि संघटना फुटली. हा घाव, ही जखम भरायला हवी. तो घाव भरून निघायला हवा, असे मोठे वक्तव्य दानवे यांनी केले आहे. एकजूटता हीच शिवसेनेची ताकद आणि ओळख होती. सर्व शिवसैनिकांनी एकत्र यायला हवे असे ते म्हणाले. दानवेंच्या वक्तव्याने राजकारणात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
तसेच, अंबादास दानवे यांनी सर्व शिवसैनिकांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. पक्ष सत्तेत असावा अशी भावना दानवे यांनी व्यक्त केली. एक शिवसैनिक म्हणून शिवसेना पुन्हा मजबूत आणि पक्ष म्हणून पुढे यायला हवी. एकतेची आशा करणे वाईट नसल्याचे ते म्हणाले.