दुर्दैवी...! भरधाव ट्रेनने दिलेल्या धडकेत ; पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू
दुर्दैवी...! भरधाव ट्रेनने दिलेल्या धडकेत ; पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. अशातच पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा रेल्वे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रेनने पोलिस अधिकाऱ्याला धडक दिली. पुण्यातील फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , पुणे रेल्वे पोलिस दलात ते कार्यरत होते. सहाय्यक पोलिस उप निरीक्षक चिंतामणी साधू पवार असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. ही घटना ६ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता घडली.

नेमकं काय घडलं?

वाडिया कॉलेजच्या पुढे असलेल्या रेल्वे क्रॉसिंगला जात असताना चिंतामणी पवार यांना रेल्वची धडक बसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते पुणे लोहमार्गमध्ये डीएसबीमध्ये कार्यरत होते. या घटनेबाबत जीआरपी पुणे यांच्याकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेले पोलिस अधिकारी चिंतामणी पवार हे मूळचे अहिल्यानगरचे होते. कर्जत तालुक्यातील सिद्धटेक नवी काठी या गावाचे ते होते. ते पुण्यात कुटुंबीयांसोबत राहत होते. त्यांच्या पाश्चात पत्नी आणि मुलं असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या मूळ गावावर शोककळा पसरली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group