दैनिक भ्रमर : गेल्या काही दिवसांत राज्यात गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे.वाढलेल्या गुन्हेगारी सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या एका घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. एका तरुणीने मित्राच्या मदतीने एकाची हत्या केल्यानं परिसरात भीतीचे वारंवारण पसरले आहे. ही घटना दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलीय.
प्राथमिक माहितीनुसार, गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे अस खून करण्यात आलेल्या 35 वर्षीय तरुणाचे नाव आहे. यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांच्या मालकीच्या प्रोटीन पझल शॉपमध्ये गोपीनाथ वर्पे गेला होता. तेथे त्याने प्रांजल तावरेला शिवीगाळ करून तिला त्रास दिला. त्यानंतर यश पाटोळे आणि प्रांजल तावरे या दोघांनी गोपीनाथ वर्पेला लोखंडी पार व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ज्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी गोपीनाथ वर्पे याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वारंवार होणारी शिवीगाळ आणि पैशांची मागणी या त्रासाला प्रांजल कंटाळली होती. त्यातूनच ही हत्याकांडाची घटना घडली.
विशेष म्हणजे गोपीनाथ गंभीर जखमी झाला त्यावेळेस प्रांजल आणि यश गोपीनाथला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित केल्यानंतर प्रांजल आणि यश दिघी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाले अन् घडला प्रकार पोलिसांना सांगितला. दिघी पोलिसांनी आरोपी यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांना ताब्यात घेतलंय. त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.