५ मुलांची आई २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली, त्यानंतर जे झालं त्याने तुम्हालाही हादरा बसेल
५ मुलांची आई २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली, त्यानंतर जे झालं त्याने तुम्हालाही हादरा बसेल
img
दैनिक भ्रमर
नात्यांना काळीमा फासणाऱ्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. बदायूं जिल्ह्यातील सतीश हे त्यांची पत्नी नीरज आणि पाच मुलांसह मामुरा गावात एका भाड्याच्या घरात राहत होते. सतीश एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांची पत्नी नीरज गेल्या तीन वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या २४ वर्षीय अर्जुन नावाच्या अविवाहित तरुणाच्या प्रेमात होती. अर्जुन एका खाजगी कंपनीत हाऊस कीपिंगचे काम करतो. सतीशला  नीरज आणि अर्जुन यांच्यात केवळ बोलचाल असल्याची माहिती होती.

सोमवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजता नीरज अर्जुनला भेटायला त्याच्या खोलीत गेली होती.  शाब्दिक बाचाबाचीनंतर अर्जुनने नीरजला मारहाण केली. या मारहाणीत नीरज बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. अर्जुन घाबरला आणि त्याने तिला जवळच्या रुग्णालयात नेले.  तिच्या स्थितीत सुधारणा न झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांनी सांगितले की, नीरजचे लग्न १३ वर्षांपूर्वी सतीशसोबत झाले होते. त्यांना पाच मुले आहेत. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सतीश पाच वर्षांपूर्वी मूळ गावाहून नीरजला घेऊन नोएडाला आले होते. इथे राहत असताना त्यांची ओळख शेजारी राहणाऱ्या अर्जुनशी झाली. हळूहळू ही मैत्री प्रेमसंबंधात बदलली. या घटनेमुळे मात्र नीरजच्या पाच मुलांचे आणि पतीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group