खळबळजनक ! 'त्या' महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उकललं; नवऱ्यानेच केली हत्या, कारण...
खळबळजनक ! 'त्या' महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उकललं; नवऱ्यानेच केली हत्या, कारण...
img
वैष्णवी सांगळे
अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी महिला पोलीस आशा धुळे (तायडे) यांची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. या हत्येचं अखेर गूढ उकललं आहे. नवीनच ट्विस्ट या प्रकरणात आले आहे. आशा यांच्या पतीनेच सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

राहुल तायडे याचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. यापूर्वीही आशा यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. तरीही हा त्रास सुरूच राहिला. अखेर एक महिना आधी राहुलने पत्नीच्या हत्येचा कट रचला. दोन मित्रांच्या मदतीने त्यांनी पत्नीचा गळा दाबून खून केला.

हे ही वाचा... 
माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

इतकेच नव्हे, तर तपास चुकवण्यासाठी त्यांनी चोरीचा बनावही रचला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहुल तायडे याने पत्नीच्या हत्येसाठी दोघा मित्रांना पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. यामध्ये २५ हजार रुपयांचा ॲडव्हान्सही देण्यात आला होता. सध्या हे दोन्ही आरोपी फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group