खुनाच्या घटनेने नाशिक हादरलं! पंचशीलनगर येथे युवकाची हत्या
खुनाच्या घटनेने नाशिक हादरलं! पंचशीलनगर येथे युवकाची हत्या
img
DB
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- गंजमाळ परिसरातील पंचशीलनगर येथे पहाटेच्या सुमारास एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे.


या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की पांडुरंग हनुमंत शिंगाडे (वय 19, रा. पंचशीलनगर, गंजमाळ, नाशिक) हा काल रात्री आपल्या घरात झोपला होता. रात्री अडीच वाजेच्या सुमारास हल्लेखोरांनी त्याच्या घरात शिरून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.


या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पांडुरंग शिंगाडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. तो दोन वेळा तडीपारही होता. हल्लेखोर त्याच्या परिचित असून, ही हत्या जुन्या वादातून झाल्याचे प्रथमदर्शनी समजते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group