हत्या की आत्महत्या ?  बड्या नेत्यासह पत्नी अन् मुलीचा संशयास्पद मृत्यू
हत्या की आत्महत्या ? बड्या नेत्यासह पत्नी अन् मुलीचा संशयास्पद मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
बिहारमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. पूर्णियामधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. बसपाचे माजी लोकसभा उमेदवार आणि उद्योगपती नवीन कुशवाहा, त्यांची पत्नी कांचनमाला आणि मुलगी तनु प्रिया यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 



या घटनेनंतर मृताचा भाऊ आणि जेडीयू नेते निरंजन कुशवाह यांनी सांगितले की, मुलगी तनु प्रिया अचानक घरात पडली. तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना वडील नवीन कुशवाह देखील पडले. याच धक्क्याने पत्नी कांचनमालाचा मृत्यू झाला. मात्र, डॉक्टरांच्या विधानामुळे प्रकरण गुंतागुंतीचे होत आहे

रूग्णालयाचे संचालक डॉ. बी.एन कुमार म्हणाले की, 'नवीन कुशवाहाच्या गळ्यात फाशीच्या खुणा आहेत. तर, त्यांची मुलगी तनु प्रियाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जखम आहे. कांचन मालाच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून येत नाहीये'.

नवीन कुशवाहा यांनी २००९ची लोकसभा निवडणूक पूर्णिया येथून बसपाच्या तिकिटावर लढवली होती. २०१० साली त्यांनी धामदहा येथून अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली होती. बुधवारी रात्री झालेल्या या घटनेमुळे केवळ पूर्णियाच नव्हे तर संपूर्ण सीमांचल क्षेत्राला धक्का बसला आहे.

आता मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर येईल. हा अपघात होता की आत्महत्या? की आणखी काही हे निश्चित होईल', असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
murder |
इतर बातम्या
Join Whatsapp Group