दैनिक भ्रमर : महाराष्ट्रात एकामागोमाग एक हत्येची प्रकरणं समोर येत असताना जळगाव जिह्यातूनही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे जळगाव जिल्हातील ही सलग चौथी घटना आहे. सलग चौथ्या दिवशी झालेल्या हत्येच्या घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे.
चारित्र्याच्या संशयावरुन नितीन दौलत शिंदे (वय 37) आणि अर्चना ऊर्फ कविता नितीन शिंदे (वय 32) यांच्यात वाद सुरु होते. नितीन हा अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यातच तो तिला माहेराहून १० लाख रुपये आणावे यासाठी तगादा लावत होता. मंगळवारी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास त्यांच्यातील वाद पेटला आणि नितीनने अर्चनाचा जीव घेतला.
हे ही वाचा...
यानंतर घटनास्थळावरून पळून न जाता तो थेट पोलिस स्टेशन मध्ये हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी मृताचा भाऊ आकाश सपकाळ याने पिंपलरगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत अर्चनाची सासू बेबाबाईलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
पिंपळगात हरेश्वर पोलिस ठाण्याच्यासहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मायांनी अटकेत असलेल्या नितीन आणि बेबाबाई शिंदे यांना पाचोरा न्यायालयात हजर केले आहे. दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.