मुळशी पॅटर्नने जिल्हा हादरला ! वाढदिवसाच्या सेलीब्रेशनमध्ये दुहेरी हत्याकांड
मुळशी पॅटर्नने जिल्हा हादरला ! वाढदिवसाच्या सेलीब्रेशनमध्ये दुहेरी हत्याकांड
img
वैष्णवी सांगळे
चित्रपटाच्या कथेला साजेसा किंबहुना चित्रपटाचाच प्रसंग वाढदिवसाच्या सेलीब्रेशनमध्ये पहायला मिळाला. मराठी चित्रपट मुळशी पॅटर्न मध्ये वाढदिवसाच्या दिवशी जशी हत्या करण्यात आली होती तशीच हत्या सांगलीमध्ये घडलीय. 



मुळशी पॅटर्न चित्रपटातील एखाद्या प्रसंगाप्रमाणेच हल्लेखोर वाढदिवसाच्या पार्टीत १०-१२ जणांसोबत आला. जेवण केले अन् स्टेजवर शुभेच्छा द्यायला गेला. त्यावेळी गुप्ती काढली अन दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्यावर सपासप वार केले. 

उत्तम मोहिते हे सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते, दलित महासंघ मोहिते गटाचे ते संस्थापक अध्यक्ष देखील होते. सांगली शहरातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर हटके पद्धतीने मोर्चे काढण्यासाठी त्यांची ओळख होती. त्याशिवाय उत्तम मोहितेंवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते. मंगळवारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता. घरासमोरच उत्तम मोहितेंनी स्टेज टाकले होते.

 डिजिटल फ्लेक्स लावले, जेवणाची पंगत, केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला. त्यावेळी उत्तम मोहितेंवर हल्ला करणारे हल्लेखोर देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर शुभेच्छा देताना उत्तम मोहिते आणि हल्लेखोरांच्या मध्ये वादावाद झाली. त्यानंतर काही वेळातच मोहितेंवर हल्ला चढवला.

आठ ते दहा जणांकडून उत्तम मोहिते यांच्यावर घरात घुसून हल्ला केला. हा हल्ला होत असताना यामध्ये हल्लेखोर असणारा शाहरुख शेख याला चाकूचा वर्मी घाव मांडीला बसला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सकाळी त्याचा मृत्यू झाला. उत्तम मोहिते यांच्या खूनाच्या घटने प्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. काही जणांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे.
murder |
इतर बातम्या
Join Whatsapp Group