सातपूर प्रबुद्ध नगर भागात ४५ वर्षीय इसमाची तीक्ष्ण हत्याराने हत्या
सातपूर प्रबुद्ध नगर भागात ४५ वर्षीय इसमाची तीक्ष्ण हत्याराने हत्या
img
Dipali Ghadwaje
सातपुर :  आज पहाटे सातपुरच्या प्रबुद्धनगर येथे अज्ञात व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

गेल्या आठवड्यातच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात एका १७ वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना घडली होती. नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत्या खुनाच्या घटनेमुळे नाशिककर पुरते भयभीत झाले आहेत. 

सातपुर परिसरातील प्रबुद्ध नगरात एका ४५ वर्षीय इसमाचा मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाल्याची माहिती सातपुर पोलिसांना मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत असल्याचे सातपुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत नलावडे यांनी सांगितले. 

याबाबत प्रबुद्ध नगरात परीसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका ४५ वर्षीय मृतावस्थेत पडलेला होता रात्र असल्याने हा प्रकार कुणाला कळला नाही परंतु दिवस उजाडल्या नंतर येणाऱ्या जाणा-यांच्या नजरेत ही घटना पडल्या नंतर परिसरातील नागरिकांनी सातपुर पोलिसांना कळवली. 

त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन तसेच यावेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले दरम्यान या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून सातपुर पोलिस अधिक तपास करत आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group