नाशिक : मेडिकल व्यवसायाच्या नावाखाली 1 कोटी 15 लाखांची फसवणूक
नाशिक : मेडिकल व्यवसायाच्या नावाखाली 1 कोटी 15 लाखांची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मेडिकल व लॅब व्यवसायाच्या नावाखाली 1 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



संतापजनक ! गरोदरपणात पोटात लाथा मारल्या, गरम तेलाने भाजलं; शेवटी महिलेनं...

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी रविकांत भगवंत शेवाळे, संस्कार रविकांत शेवाळे (दोघेही रा. सूर्या इलाईट, काकड मळा, मखमलाबाद रोड, पंचवटी) व रवींद्र बळवंत रोकडे यांनी संगनमत करून राहुल वसंत निकम, संजीवन केशव म्हात्रे, निर्मलकुमार शिवलालजी शर्मा व भरत भवानीशंकर शर्मा यांना मेडिकल व्यवसाय व लॅब व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखविले व त्यासाठी तीनही आरोपींनी चार इसमांकडून वेळोवेळी 1 कोटी 15 लाख रुपये घेतले. 

मात्र मेडिकल व लॅब व्यवसाय सुरू न करता चार जणांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. 25 सप्टेंबर 2023 ते 10 नोव्हेंबर 2025 या कालावधीत हनुमानवाडीतील लक्षरंग अपार्टमेंटमध्ये घडला.

या प्रकरणी प्रशांत नानाजी पवार (रा. लक्षरंग अपार्टमेंट, हनुमानवाडी, पंचवटी) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तिघा आरोपींविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group