सातपूर एमआयडीसीत बॉश कंपनीसमोर गुरुवारी (दि. ६) सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास आयशर व दुचाकीच्या धडकेत प्रशांत गांगुर्डे (२९) जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत गांगुर्डे (रा. आयटीआय कॉलनी, श्रमिकनगर) हा दुचाकीने जात असताना त्याच्या दुचाकीला आयशर ने धडक दिली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई व एक विवाहित बहीण आहे. एकुलत्या एक, कर्त्या मुलाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.