मालेगावमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार,  वडिलांशी भांडण झाल्याची मुलीला शिक्षा
मालेगावमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, वडिलांशी भांडण झाल्याची मुलीला शिक्षा
img
वैष्णवी सांगळे
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. गावातीलच एक २४ वर्षीय युवक विजय संजय खैरनार, याने या निष्पाप चिमुकलीवर प्रथम लैंगिक अत्याचार केला. या अमानुष कृत्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने चिमुरडीचे डोके दगडाने ठेचून तिची क्रूरपणे हत्या केली. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून हा गुन्हा किती भयानक आणि अमानुष होता याची कल्पना येते. 

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण राज्यात या घटनेचा संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली आहे. प्राथमिक तपासात, आरोपी विजय खैरनारचे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. साधारण एक महिन्यांपूर्वी दोघांचे वाद झाले होते. त्याचा राग या आरोपीच्या मनात होता. या नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केले. 

पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. अशा राक्षसी वृत्तीला महाराष्टात थारा नाही, हरामखोराला कठोर शिक्षा होईल. नराधमाला फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group