सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी सनीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी सनीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
img
दैनिक भ्रमर


सातपूरच्या गोळीबार प्रकरणातील आरोपी सनी उर्फ ललित अशोक विठ्ठलकर (वय 35, रा. सावता नगर, सिडको) याच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हा घडल्यापासून सनी फरार झालेला होता. सनी आज नाशिक मध्ये येणार असल्याची गुप्त माहिती अंबडच्या गुन्हे पथकाला मिळाली होती.  त्यानुसार पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आडगाव येथे सापळा रचून सनीला ताब्यात घेतले.  सनी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी त्र्यंबकेश्वर, सातपूर, अंबड आणि नाशिक रोड येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group