बळी मंदिराजवळ मारुती सेलेरिओ कारने घेतला पेट
बळी मंदिराजवळ मारुती सेलेरिओ कारने घेतला पेट
img
दैनिक भ्रमर

मुंबई आग्रा महामार्गावर बळी मंदिरासमोर आज संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मारुती सेलेरिओ कारने अचानक पेट घेतला.

एम एच ०१ सीव्ही 9833 या क्रमांकाची मारुती सेलेरिओ कार जात असताना बळी मंदिरासमोर अचानक गाडीने पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. ही माहिती अग्निशमन दलाला कळविताच केके वाघ अग्निशमन दलाच्या एका बांबाने ही आग आटोक्यात आणली. या आगीत गाडीचे बोनेट, बंपर, वायरिंग, काच व रेडिएटर जळून खाक झाले आहे.

हिरावाडी येथील रहिवासी तेजस व्यास यांच्या मालकीची ही गाडी आहे.

इतर बातम्या
उद्या

Join Whatsapp Group