नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- माजी महापौर दशरथ पाटील यांचा धाकटा मुलगा रोहित (वय २८) हा बेपत्ता झाल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या बाबत प्रेम दशरथ पाटील यांनी पोलीस ठाण्यात मिसिंग अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे की, आज दि. ८ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास रोहित याने पेट्रोल पंपावरील भरणा करण्याचे पैसे आणि त्याची ह्युंदाई आय १० कार त्याचा मित्र जयेश वाघ याच्या ताब्यात देऊन तो कुठे तरी निघून गेला आहे.
तेव्हा पासून त्याचा मोबाइल देखील बंद येत आहे. तो अद्याप घरी परतला नसल्याने पोलिसांना कळविण्यात आले आहे. पोलिसही त्याचा शोध घेत आहेत. आज सकाळी रोहित मधुर स्वीट जवळ गाडीतून उतरला होता, तिथं पर्यंत तो CCTV मध्ये दिसतो आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.