नाशिक : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मजुराचा अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार, १५ व्या वर्षीच राहिली गरोदर
नाशिक : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मजुराचा अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार, १५ व्या वर्षीच राहिली गरोदर
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष दाखवून मजुराने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आरोपी दीपककुमार रमेशकुमार पाल (वय 21, रा. नाशिकरोड) हा मजुरी करतो. तो आणि पीडित 15 वर्षीय युवती एकाच गावातील रहिवासी आहेत. सन 2024 च्या गणपती उत्सवापासून त्यांच्यामध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.

हे ही वाचा... 
नाशिक : ‘या’ कारणातून पतीने केला पत्नीचा खून

तू याबाबत कोणाला काही सांगितलेस, तर तुला आणि तुझ्या आईवडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देत तो तिच्यावर अत्याचार करीत राहिला. यातून ती गरोदर राहिली. तिला उलटी होण्याचा त्रास सुरू झाल्याने तिला तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले असता ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी पीडितेच्या आईला सांगितले. त्यानंतर या गोष्टीला वाचा फुटली. 

हे ही वाचा... 
येवला : मी पाच वर्षांपूर्वीच मरण पावलो आहे... चिठ्ठीत व्यथा मांडत तरुणाची आत्महत्या

या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दीपककुमार पाल याला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group