Nashik : टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने युवतीचा मृत्यू
Nashik : टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने युवतीचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- राँग साईडने ओव्हरटेक करताना गाडी स्लीप होऊन झालेल्या अपघातात टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने 17 वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बारदान फाट्यावर घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. 24 ऑगस्ट रोजी नीलेश शिवाजी पाटील हा माही मनीष शर्मा (वय 17) हिच्यासमवेत एमएच 15 केबी 5566 या क्रमांकाच्या मोटारसायकलीवरून गंगापूर गावाकडून आनंदवल्लीकडे जात होता. बारदान फाटा येथून सिग्नलवर चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याची मोटारसायकल स्लीप झाल्याने दोघे खाली पडले.

हे ही वाचा 
मोठी बातमी ! 'या' जिल्ह्यात भाजपचं धक्कातंत्र, रात्रीत बदलले पालकमंत्री

त्यावेळी एमएच 15 डीएल 0735 या क्रमांकाचा टेम्पो त्यांच्या मागून येत होता. त्यांच्यामध्ये अंतर कमी असल्याने रस्त्यावर पडल्यानंतर माही शर्माच्या डोक्यावरून टेम्पोचे चाक गेल्याने या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, नीलेश पाटीलच्या मोटारसायकलीचेदेखील नुकसान झाले आहे.

या प्रकरणी नीलेश पाटील याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group