विहितगाव-वडनेर रोडवर युवकाला जिवे मारण्याचा प्रयत्न;
विहितगाव-वडनेर रोडवर युवकाला जिवे मारण्याचा प्रयत्न;
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : अंगावर थुंकल्याचा जाब विचारल्याने चौघांनी एका युवकाला धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना विहितगाव वडनेर रोडवर घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादी सुमित सुरेश कडभाने (वय २६, रा. धोंगडे मळा, नाशिकरोड) हे त्यांच्या दोन मित्रांसमवेत कामावर जाण्यासाठी दुचाकीवरून जात होते. ते विहितगाव वडनेर रोडवरील खांडरे लॉन्सजवळ आले असता त्यांना एमएच १५ एचयू १०३२ या क्रमांकाच्या कारने ओव्हरटेक केले. त्यावेळी गाडीतील एक इसम कडभाने यांच्या अंगावर थुंकला. 

हे ही वाचा 
श्रेयस अय्यर- मोहम्मद शमी उतरणार मैदानात ! Duleep Trophy लाईव्ह कुठे पाहता येणार?

कडभाने यांनी त्याला हटकले असता त्या गाडीचालकाने कडभाने यांच्या दुचाकीला कार आडवी लावली. थुंकल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने गाडीमधील प्रथमेश कसबे, मयूर जानराव आणि दोन अनोळखी इसम गाडीतून उतरले. त्यापैकी एकाने कडभाने यांच्या कानाच्या मागे धारदार शस्त्राने मारून त्यांना गंभीर जखमी केले. 

हे ही वाचा 
दुर्दैवी ! नांदगाव- मनमाड रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक; दोन जण ठार

त्यादरम्यान इतरांनी कडभाने यांचे मित्र अंकुश आणि श्रीकेश यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून मारहाण करीत कडभाने यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कडभाने यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास निरीक्षक सपकाळे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group